महिलांवरील अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्रप्रदेशमध्ये दाखल.
गृहमंत्र्यांसमवेत अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अश्वती दोरजे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश.
विजयवाडा येथे गृहमंत्री आणि शिष्टमंडळाचे आंध्रप्रदेशचे अपर पोलीस महासंचालक ए. रविशंकर यांनी केले स्वागत. हे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री वाय.एस. जगनरेड्डी, गृहमंत्री श्रीमती मेकाथोटी सुचारिथा यांच्यासह आंध्रचे पोलीस महासंचालकांबरोबर #दिशा कायद्याबाबत करणार चर्चा.