नात्यात तुम्ही पूर्वी काय केलं,किती खस्ता खाल्ल्या,किती जुगाड केले,धावपळ केली याला काही महत्व नसतं. कटू वाटत असेल तरी पचवा.भूतकाळातील आठवणी आणि भविष्याची स्वप्ने यात आपण वर्तमानाला गृहीत धरतो.
आपले आई वडील कसे नातं टिकवून आहेत तसं आपलंही असावं अशी तुलना करू नका. आपण आजच्या पिढीमध्ये जगतोय. सतत अनेक लोकांशी संपर्क येतो. प्रत्येकाकडे चॉईस असतो. मुलगा असो वा मुलगी.
दोघांमध्ये कोणीतरी तिसरा येण्याचा नेहमी प्रयत्न करणार. आपण आपल्या नात्याला किती प्रायोरिटी देतो ते महत्वाचं. जोडीदाराला गृहीत धरणं महागात पडू शकतं. तुमचं दुर्लक्ष होणं आणि तिसऱ्या व्यक्तीने अति लक्ष देणं याची जर गाठ पडली तर नातं तुटण्याची पूर्ण शक्यता असते.
नातं टिकवायचं असेल तर रोजची धडपड महत्वाची. जमत असेल तरच यात पडावं आणि एकदा पडलो तर ते निभावताही यायला हवं. फुलपाखरासारखं सतत इकडून तिकडे उडत राहणं कोणालाही जमतं. प्रेम करणं जमायला हवं…
– अभिनव बसवर