आपल्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लोकप्रिय टिकटॉक ऍपवर प्रचंड लोकप्रियता मिळवत 1 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत.
शिल्पा शेट्टीचे टिक-टॉकवर 50 दिवसांमध्ये 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
शिल्पा म्हणाली.. : कोणी 50 दिवसांमध्ये 1 कोटी कमवू शकतं का? हा मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही.
तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले 1 कोटींचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हेत
दरम्यान, शिल्पा ‘निकम्मा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.