दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टी आता राष्ट्र निर्माण अभियानाद्वारे ‘मुलभूत कामाचे राजकारण’ आता घरोघरी पोहचवणार आहे. महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात झाली आहे आणि हे अभियान आता २३ मार्च, २०२० पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानाद्वारे पक्ष दिल्लीचं विकासाचे मॉडेल घरोघरी पोहचवणार आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला ‘कामाच्या राजकारणात’ सहभागी होण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे. या अभियानाद्वारे जनतेसमोर दिल्ली मॉडेल आणि महाराष्ट्रातील मॉडेलची तुलना करण्यात येणार आहे. यामुळे लोकांना दिल्लीत असलेल्या ‘कामाच्या राजकारणाची’ माहिती होईल आणि त्याच प्रकारच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात सुरू होईल.
या अभियानासाठी आम आदमी पार्टीने मिस कॉल क्रमांक ९८७१०१०१०१ जाहीर केला आहे. हा नंबर जाहीर होताच २४ तासात ११ लाख जणांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले देशभरातून मोठ्या प्रमाणात या अभियानास मोठा मिळत आहे. दिल्ली सरकारने केलेल्या वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गोष्टींचा प्रभाव आता बाकीच्या राज्यामध्ये देखील दिसून येत असून तेथील राज्य सरकारे दिल्ली मॉडेल लागू करण्याचा विचार करत आहेत. याद्वारे ‘कामाच्या राजकारणाला’ बळ मिळत आहे. हे राजकारण पुढे नेण्यासाठी पार्टी मिस कॉल अभियानाद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये याचा प्रसार करणार आहे. पार्टी लवकरच राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये प्रेस कॉन्फरन्स द्वारे अभियानाची माहिती माध्यमांना देणार आहे. आणि त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन करणार येणार आहे.