कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून तरी नियंत्रणात ठेवली आहे मात्र आणखीही शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्र या संकटावर मात करेल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
दरम्यान, डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच; जनतेने गर्दी करणे बंद करावे, सूचनांचे पालन करा जेणेकरून येणा-या संकटावर आपल्याला मात करता येईल असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.