कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली.
भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री श्री. देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक अंतर सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.