चीनमधील वूहांनपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा जगभर घट्ट बनला आहे. जगातील 150हुन अधिक देशात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सगळ्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये आढळून आला. त्यामुळे COVID-19 म्हणजेच कोरोनाव्हायरस डिसीज 19 असं नामकरण करण्यात आलं. कोरोना हा संसर्ग सर्दी तापाशी संबंधित पूर्वीपासून अस्तित्वात असलेला आजार आहे, परंतु आता त्याच्या नवीन प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग लक्षात आला त्यालाच covid19 म्हणतात. वूहान मधील sea food मार्केट मधून या विषाणूंचा प्रसार झाला असं समोर येत असले तरी हकीकत निराळी असू शकते?
सर्वप्रथम डिसेंबर 19मध्ये चीनच्या वुहानमधील डॉ. ली वेलीयांग यांच्याकडे सर्दी तापाची लक्षणे असलेले काही पेशंट ऍडमिट झाले परंतु हा सामान्य सर्दी ताप नसून वेगळाच प्रकार आहे असा डॉक्टर ली यांना संशय आला , निरीक्षणानंतर हा कोरोना संसर्ग आहे असे डॉक्टर ली यांना समजले आणि त्यांनी आपल्या साथीदार dr. शी चर्चा केली आणि सामाजिक माध्यमातून वुहान मध्ये कोरोना विषाणू च्या संसर्गाची लागण झाली आहे हे निदर्शनास आणले बातमी सगळीकडे पसरत असताना चीन सरकारने या पोस्टवर हरकत घेतली आणि असा प्रकार नाही असे सांगितले. डॉ.ली कोरोनाव्हायरसग्रस्त पेशंटला उपचार देत होते आणि अचानक सात फेब्रुवारी 2020रोजी dr. ली यांचा कोरोना ने मृत्यू झाला असून त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सरकाने केले होते असे चीनकडून सांगण्यात आले अशाप्रकारे सर्वात आधी कोरोना संसर्गाची माहिती देणारे, कोरोनाग्रस्त पेशंटवर उपचार करणाऱ्या पहिल्या dr. चा मृत्यू झाला त्यांचा हा मृत्यू जगातील इतर काही मृत्यूसारखा गूढ आहे का हा संशोधनाचा विषय आहे. एव्हाना सर्व जगात चीन कोरोना संसर्गाने बाधित झाला आहे ही माहिती जगभर पोहोचली होती चीनमधील वुहान मध्ये या रोगाने थैमान घातले होते. वूहान मध्ये हजारो लोकांना संसर्ग झाला होता तर काही हजारात लोक मृत्युमुखी पडले होते. संपूर्ण वुहान पूर्णपणे lock down करण्यात आले होते.
कोरोना हा अदृश्य विषाणू चीनमधून हवाईमार्गाने सर्व जगभर पसरला परिणामी डब्ल्यूएचओ ने कोरोना महामारी संसर्ग जगभर पसरत आहे असे घोषित केले आणि कोरोना महामारी जागतिक संकट बनले. या महामारीचे वाईट परिणाम जग भोगत आहे अगदी वैद्यकीय सुविधेच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीमध्ये या विषाणूने चीनपेक्षा जास्त बळी घेतले. इटलीमध्ये दररोज सातशे आठशे पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडू लागले याचं एकमेव कारण म्हणजे सुरुवातीच्या काळात इटलीने या संसर्गाकडे केलेलं दुर्लक्ष होय. इटलीचे पंतप्रधान गीसीपी कांटे यांनी सरकार या महामारीला रोखण्यास असमर्थ आहे असे सांगितले तेव्हा मात्र वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या इटलीची ही अवस्था असेल तर आपलं काय होईल हा प्रश्न इतर देशांपुढे उपस्थित झाला. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशाला सुद्धा या आजाराने जेरीस आणले आहे. दुबई, इंग्लंड, इराण, स्पेन, जर्मनी, न्यूयार्क, फ्रान्स सह अनेक देश या कोरोनाच्या थैमानाला सोसत आहेत.
जगातील इतर देशाप्रमाणे भारतात सुद्धा कोरोना विमानाने आला. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये 30जानेवारी 2020रोजी आढळला आणि तो चीनमधून प्रवास करून आलेला होता. या बातमीने संपूर्ण भारत वासियांच्या काळजात धस्स झाले. विकसनशील भारत देशाची लोकसंख्या 130 कोटींच्यावर आहे आणि जर आपल्या देशात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने झाला तर आपला देश या संकटाला कसे तोंड देणार हा प्रश्न तुमच्या-माझ्या मनात आला नसेल तरच नवल. भारतात कोरोना दाखल झाला आणि भारतीयांमध्ये सामाजिक माध्यमातून कोरोना विषयी माहिती देण्याचा एकच धडाका सुरु झाला तर आपणही जाणून घेऊ कोरोना ची लक्षणे वा घ्यायची काळजी………………………. कोरोनाची लक्षणं… कोरोनाबाधित व्यक्ती कडून कोरोनाचा प्रसार इतर व्यक्तीकडे होतो, कोरोना हा विषाणू हवेतुन पसरत नाही कोरोणा बाधित व्यक्तीची जवळीक आल्यानंतर हातात हात दिल्यानंतर अथवा अशी व्यक्ती कुठे जवळ खोकली किंवा शिंकली तर त्यातून जवळच्या व्यक्तीला संक्रमण होते. तसंच अशी व्यक्ती शिंकली असता त्यठिकाणी असलेल्या वस्तूंच्या पृष्ठभागावर हा विषाणू पडतो आणि त्या वस्तूला इतरांनी हात लावला व तोच हात तोंड, डोळे व नाकाला लावला तर या अवयवावाटे विषाणू शरीरात प्रवेश करतो, सुरुवातीला साधारण चार दिवस अशा व्यक्तीमध्ये काहीच लक्षणे आढळत नाहीत पुढे हळूहळू सर्दी, डोकेदुखी, घसा खवखवणे ताप उलट्या, अतिसार ची लक्षणे अढळण्यास सुरुवात होते थकवा जाणवतो वेळीच लक्ष न दिल्यास श्वसन संस्थेवर परिणाम करतो व श्वास घेण्यास त्रास होतो अशा वेळी अनेक पेशंट दगावन्याची भीती वाढते…..
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी.. आजवरच्या चर्चेतून कोरोना होऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाचा आणि एकमेव उपाय म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवणे म्हणजेच सामाजिक अंतर ठेवणे म्हणजेच कुठल्याही कारणासाठी एकत्र न येणे. ज्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त आहे तिथे तर लोकांनी घराबाहेर पडूच नये जेणेकरून संसर्ग वाढीस न लागण्यासाठी मदत होईल.
आता भारतात बहुतेक राज्यात कोरोनाचे पेशंट दिसून येत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा, रुग्णांचा आकडा एक नंबर वर जाऊन पोहोचला त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. महाराष्ट्रात आतापर्यंत एकून 690पार ग्रस्त रुग्ण आहेत तर 32लोक यामुळे मृत्यू पावले आहेत. संपूर्ण भारतात 5.4. 2020 रोजी एकूण 3374पार कोरोना ग्रस्त असून 79जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर संपूर्ण भरतात 267लोक पुर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
भारतामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी 19. 3. 2020 रोजी देशवासीयांना संबोधित केले दरम्यान कोरोना हे संपूर्ण जगावरील मोठं संकट असून यामुळे संपूर्ण मानवजात संकटात आली आहे असं वक्तव्य केलं यावेळी मागील दोन महिन्यापासून जगातून येणाऱ्या कोरोना विषयीच्या सगळ्या बातम्या वर देशाचे संपूर्ण लक्ष केंद्रित झालेले आहे असेही सांगितले यावेळी स्वतः पंतप्रधानांनी देशवासीयांना कोरोनाशी लढन्यासाठी उपाय सुचविले आणि सामाजिक अंतर ठेवूनच या महामारीला तोंड देऊ शकतो असे सांगितले त्यासाठी पुढील काही आठवडे आपण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले या दिवशी मोदीजींनी संपूर्ण देशाने रविवार 22 मार्च 2020 रोजी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जनता कर्फयुचे पालन करण्यासाठी समर्थन मागितले आणि 22 रोजी जनता कर्फयु चालू असतानाच सायंकाळी पाच वाजता सर्वांनी टाळ्या घंटा व शंखनाद करण्यास सांगितले संपूर्ण भारत देशाने या जनता कर्फयुला अतिशय गांभीर्याने घेतले आणि या दिवशी दिवसभर देश असा काही शांत झाला की भारत मातेला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला असेल. सायंकाळी पाच वाजता सर्व भारतीयांनी या कोरोना च्या विरोधात दोन हात करण्यास सज्ज झालेले आपले सर्व डॉक्टर नर्सेस वॉर्डबॉय पोलीस यंत्रणा सफाई कामगार शासन-प्रशासन यांच्या कार्याप्रती आदर भाव म्हणून टाळ्या, घंटानाद करून समर्थनाचा उत्साह संपूर्ण देशाने अनुभवला अर्थात काही ठिकाणी अतिशयोक्ती झाली परंतु या दिवसानंतर संपूर्ण भारत देशाने कोरोनाशी लढण्याची मानसिक तयारी केली असे दिसून आले हाच काय तो या घटनेचा फायदा. जनता कर्फ्यूच्या यशानंतर मोदीजींनी 23 तारखेला रात्री 12 नंतर म्हणजे 24 तारखेपासून संपूर्ण भारत देश लॉक डाऊन करण्यात येणार आहे अशी घोषणा केली आणि इथून पुढे सुरू झाली भारतीयांची कोरोनाशी खरी लढाई. आणि भारत देशाने अनपेक्षीतपणे परंतु अपेक्षित दिशेने कोरोनाचा मुकाबला करण्याच्या दिशेने योग्य पाऊल टाकलं असं म्हणता येईल.
Lockdown India नंतर केंद्र सरकारने सामान्य गरीब मजूर लोकांसाठी निरनिराळ्या घोषणा केल्या त्यात त्यांना राशन नगण्य किंमतीत देण्यात येईल तसंच गरिबांना प्रत्येकी पाचशे रुपये दिले जाणार अशी घोषणा केली. याव्यतिरिक्त कोरोना महामारी चा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या कराव्या लागणाऱ्या सगळ्या उपायोजना व अत्यावश्यक सुविधा पोचवण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर आजतागायत म्हणजे पाच एप्रिल 2020 पर्यंत lockdownindia l दरम्यान पंतप्रधानांनी मन की बात द्वारे देशवासीयांची संपर्क केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संपर्क साधला व परिस्थितीचा आढावा घेतला. एकंदरीत 24 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत लागू झालेल्या लॉकडाउन मुळे सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम चे आदेश दिले गेले तसेच सर्व शाळांना व महाविद्यालयांना पूर्वीच सुट्ट्या देण्यात आल्या होत्या काही परीक्षा ही पुढे ढकलण्यात आल्या . फक्त अत्यावश्यक सेवा व खाण्यापिण्याच्या वस्तूची खरेदी चालू आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोना विरुद्ध ची आपली लढाई सुरुवातीच्या काळापासूनच मजबूत केली आहे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मार्चच्या सुरुवातीच्या काळातच गर्दी कमी करण्यासाठी निर्णय घेतले व सूचना दिल्या होत्या, आरोग्य मंत्री राजेश टोपे जी, वैद्यकीय सेवा देणारे सर्वजण, सर्व पोलिस यंत्रणा सफाई कामगार अतिशय काटेकोरपणे या परिस्थितीला तोंड देत आपली आपली काम करत आहेत. आपले आरोग्य मंत्री स्वतः फिल्डवर जाऊन आढावा घेताना दिसले आहेत. महाराष्ट्रात दररोज कोरोना ग्रस्त पेशंटची संख्या वाढताना आढळल्यामुळे निरनिराळ्या माध्यमातून अनेक जण कोरोना संसर्ग संकटा विषयी जनजागृती करत आहेत शासन-प्रशासन वेळोवेळी सूचना आपल्याला देत आहे आणि या महामारी च्या लढ्यात विजय मिळवण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे.
कोरोना संक्रमणाच्या काही स्टेज आहेत त्यात महाराष्ट्रातील संक्रमण पाहिले तर इथल्या सुरुवातीच्या केसमध्ये परदेशातून आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर या लोकांशी थेट संपर्क आलेले लोक संशयित अथवा कोरोनाची लागण झालेले आढळले. कोरोना संक्रमणतील सर्वात कठीण स्टेज म्हणजे community trasfer of virus म्हणजेच सामाजिक स्तरावर संसर्गाची लागण मग यामध्ये कुणालाही संसर्ग होऊ शकतो आणि हीच स्टेज असते हाय रिस्कची, या स्टेज मध्ये संसर्ग रोखण्यास प्रचंड अडचणी येतात हॉस्पिटल हॉस्पिटल स्टाफ पुरत नाही आणि आपण एका अदृष्य विषाणू पुढे हतबल होतो जसं आज इटली ची अवस्था झाली आहे. सुदैवाने भारतात आणि महाराष्ट्रात ही अवस्था अजून नाही असं म्हणण्यास वाव आहे आणि ही स्टेज टाळायची असेल तर आपल्याला यापुढे सरकार सांगेल तितके दिवस लॉक डाऊन पाळावा लागणार आहे त्याला पर्याय नाही त्यामुळे हा पिरेड वाढू शकतो तो फक्त आपल्यासाठीच.
आता थोडासा महाराष्ट्र शासन, प्रशासन आणि जनता याच्यातील ताळमेळ कसा आहे ते पाहू. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो त्या भागातील परिसर सील करण्यात येत आहे, तेथील संबंधितांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. सुरुवातीला नायडू रुग्णालयात प्रथम या पेशंटला ठेवण्याची सोय केली होती परंतु आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये या पेशंटसाठीवॉर्ड तयार केले आहेत सर्व यंत्रणा या कामात जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत त्यांना खरच मानाचा मुजरा. यादरम्यान पेशंटच्या विलीगीकरणाच्या काही पायऱ्या आहेत जसं की लक्षण आढळून आलेल्या पेशंटना हॉस्पिटल मध्ये भरती करून त्याच्या आवश्यक त्या चाचण्या करणे व त्याचा इतर कोणाशी संपर्क आलेला आहे का ते पाहून त्यांना क्वारंटाईन करणे. पॉझिटिव्ह पेशंटसाठी वेंटिलेटर व इतर वैद्यकीय साधनांची व्यवस्था करणे. प्रवास करून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलेल्या लोकांची माहिती काढून त्यांची विचारणा व तपासणी करणे त्यासाठी आशासेविका स्वतः गावोगाव काम करत आहेत. यातला क्वारंटाईन हा शब्द महत्त्वाचा असून त्याचा अर्थ असा होतो की साथीच्या रोगाची लागण झालेल्या भागातून प्रवास करून आलेल्या लोकांना वेगळे ठेवणे मग ते हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवले जाऊ शकतात किंवा आता लोकांना घरी वेगळे राहण्याचे आदेश दिले जात आहेत आणि ओळख पटण्यासाठी त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन अथवा क्वारंटाईन असा शिक्का मारला जात आहे साधारण चौदा दिवस किंवा त्या लोकांमध्ये साथीच्या आजाराची लक्षणे नाहीत हे सिद्ध होऊ पर्यंत त्यांना क्वारंटाईन केले जाते त्यामुळे हा प्रसार थांबण्यास मदत होते. महाराष्ट्र सरकारने या कामात सुरुवातीपासूनच तत्परता दाखवली त्यामुळे आपण सरकारचे आभार मानायला हवे. आता सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यातुन त्या जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी आहे. आता फक्त आधी प्रवास करून आलेल्या लोकांमध्ये ही लक्षणे आढळली नाही तर प्रसार रोखण्यात नक्कीच यश येईल.
भारत सरकारने जाहीर केलेल्या व सर्व राज्यांना लागू असलेल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर भारतासारख्या देशात जिथे आजही 50 टक्केच्या वर लोक रोज मजुरी करून आपलं पोट भरतात म्हणजे ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे सरकारने त्यांच्यासाठी काही योजना तयार केली आहे लॉकdown च्या दहा ते बारा दिवसांपर्यंत ही व्यवस्था गरजूपर्यंत पोहोचने मुश्कील होतं त्यामुळे हे मजूर रोजगार गरीब लोक अतिशय गोंधळून गेलेले आढळले मोठ्या शहरात कामास असलेले किंवा इतर राज्यात कामास असलेले लोक घराकडे परतू लागले या ठिकाणी शासनाने वारंवार या लोकांना आग्रह केला आहे की जिथे आहात तिथेच राहा आम्ही तुमची व्यवस्था करू परंतु या प्रक्रियेला थोडा वेळ लागल्यामुळे हे मजूर प्रवास वाहतूक बंद झाल्यामुळे पायी गावाकडे परतू लागल्याचे दिसले दरम्यान हे लोक उपाशी पोटी उन्हातानात चालत गावाकडे परतताना आढळून आले. आणि या covid-19 मुळे भारत देशाचं वास्तववादी चित्रच जगासमोर आणि तरुण भारतासमोर उघड झालं ते म्हणजे श्रीमंत लोकांसाठी इथल्या यंत्रणा तात्काळ मदतीस तत्पर असतात परंतु तिथेच गरिबांपर्यंत पोहोचण्यास त्यांना वेळ लागतो अशा परिस्थितीत मला सांगा भारत देश विकसित कसा व कधी होईल हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का !आज या गोरगरिबांना जीवनावश्यक मदत पुरवणाऱ्या हजारो सामाजिक संस्था जागोजागी काम करत असून शासनाच्या मदतीची वाट न बघता त्याचे सुद्धा शतशः आभार.
आजपर्यंत भारतात कोरोना high risk stage मध्ये गेलेला नाही ही समाधानाची बाब म्हणावं लागेल. संपूर्ण देशवाशियांचा संकल्प आणि संयम म्हणजे कोरोना -को -हराना -हैं ही गोष्ट दृष्टीक्षेपात येत आहे अशावेळी मला……………………………………….. घोर संकटं झेलून घेतील, आमुचे अजिंक्य बाहू……… काळासही झुंज देउनी…. सदैव विजयी राहू या ओळी आठवतात.
आज कोरोना महामारीने जगातील सर्व देशांना एकमेकांपासून दूर केले आहे, अशावेळी भारत हा एकजुटीने या आजाराविरोधात लढत आहे आणि त्यात India आणि भारत यातील फरक उमटून पडत आहे कारण इंडियातील सुशिक्षित नोकरदार वर्ग, मोठ्या शहरात वा परदेशात कामास असलेला प्रत्येकजण आपल्या भारतातील गावाकडे येऊ पाहत आहे, आला आहे. मी स्वतः बीड जिल्यातील रहिवाशी असून बीड जिल्हा उसतोडकामगार, सुशिक्षित बेरोजगार, अल्पभूधारक, शेतकरी मजूराचा जिल्हा आहे आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह केस नाही हे सांगताना इथल्या स्थानिक शासन, प्रशासन, सामाजिक कार्यकत्यांचं नियोजनाचं कौतुक करावं लागेल. आमचे कलेक्टर राहुल रेखावरसाहेब, s. P. हर्ष पोद्दार साहेब व अगदी जमिनीवर काम करनारा प्रत्येक व्यक्ती गरजुंना मदत करत आहेत. उद्या बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही किंवा कमी प्रमाणात सक्रिय झालाच तर त्याचे सर्वस्वी श्रेय आधी उल्लेख केलेल्या सर्वांना जाईल आणि ते सत्कारास पात्र आहेत. बीड जिल्ह्याच्या बाबतीत सगळ्यात काळजीची व खंत वाटण्याची गोष्ट म्हणजे ऊसतोड कामगार बीडकर अनेक साखरसम्राटांच्या कारखान्यावर अडकलेला असून त्यांना लॉक down मध्ये सुद्धा ऊस तोडावा लागला आहे मुख्यमंत्र्यांनी या लोकांची सोय करण्याची मागणी केली आहे तरी कारखानदारांकडून अंमलबजावणी करण्यास दिरंगाई झालेली आढळून आलं, एक, दोन ठिकाणी या ऊसतोड कामगारांनी पोलिसाकडून मारहाण झाली आहे हे निषेधार्ह आहे.
आज कोणताही देव धर्म मानवजातीला वाचवू शकत नाही फक्त आरोग्य यंत्रणा आणि सरकारचे योग्य पावलंच या परिस्थितीतुन आपल्याला बाहेर काढतील त्यामुळे stay at home, stay safe…
– अर्चना सानप, बीड