कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.