भारताची विविधतेतील एकता जगाने अनेकदा पाहिलीच जसं कारगिल युद्ध पण आजची “जनता कर्फ्यू” च्या निमित्ताने भारतीय लोकांनी दाखवलेली एकजुटता जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल.जगभर”कारोना”या महामारी ने थैमान घातलेले आहे आज जगभरातील 180 देशाला कोरोना नी कवेत घेतलेले आहे. म्हणून संपूर्ण जग कोरूना युद्धात सहभागी झालेला आहे.
यावरून हे युद्ध पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध पेक्षाही ही भयानक आहे जवान सिमेवर लढत आहेत, डॉक्टर नर्स हॉस्पिटल मध्ये लढत आहे, पोलिस रस्त्यावर लढत आहेत, अत्यावश्यक सेवा आपल्या सेवेसाठी लढत आहे, प्रशासन सुव्यवस्थेसाठी लढत आहे, प्रत्येक जण युद्ध जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत जीवनाची बाजी लावत आहेत, म आपण सामान्य नागरिकांनी का मागे राहायचे? आपण पण युद्धात सहभागी व्हायचे, आपल्याला फक्त घरात बसायचे आहे, संयम पाळायचे आहे, दारावर टक टक करणाऱ्या कोरोणा नावाच्या शत्रूला दार न उघडता पळवून लावायचे आहे आणि कोणते युद्ध जिंकण्यासाठी स्वतःवरचा संयम सद विवेक बुद्धी हेच मोठे हत्यार लागते,आणि ते आपल्याकडे आहे, तेव्हा चला युद्ध लढूया आणि जिंकूया…. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू…..– शशिकांत ढिवरे, नाशिक