निसर्ग म्हणजे वेली , वनस्पती, झाडे, भूजल, शेती, माळरान , नदीनाले , जंगल, आकाश आणि समुद्र. मनुष्य नेहमीच स्वत:च्या महत्त्वाकांक्षेमुळे निसर्गावर अत्याचार करत आला आहे. त्यामुळे निसर्गाची खूप मोठी होनी झालेली आहे. अलीकडेच आपण पाहिले तर वाढती उष्णता असेल किंवा कुठल्याही मोसमात मेघ बरसने. मनुष्याच्या स्वार्थीपणामुळे व निष्काळजीपणामुळे जे नदीनाले दुषित झाली होती ते लाॅकडाऊन च्या काळात मनुष्य घरी बसल्याने स्वच्छ होताना दिसत आहेत. मनुष्याचे धावपळीचे जीवन थांबल्यामुळे जे प्रदूषण वाढले होते त्यावर निसर्ग मात करून पुन्हा एकदा बहरताना दिसतोय. जगाभरातील बरयाच कंपन्या बंद असल्याने प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे आणि हळूहळू पर्यावरणात सुधारणा होत आहे. फक्त आपल्या देशातच नाही तर जगभरातून खूप छान छान निसर्गाच्या सौंदर्याचे चित्र समोर येते आहेत. निसर्ग त्याचे हरवलेलं सौंदर्य परत मिळवत आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
कोरोना वायरस संक्रमणाच्या प्रादुर्भावानंतर जीवित हानी रोखण्यासाठी देशव्यापी लाॅकडाऊन पुकारले गेले आणि त्यानंतर हवा पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण पण घटले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालानुसार लाॅकडाऊनमुळे गंगा नदीचे पात्र बरयाच प्रमाणात स्वच्छ होताना दिसत आहे. गंगा नदीच्या पाण्यात ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा झाल्याचा दावा केला जात आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील टाॅप १०० शहरांपैकी ९० पेक्षा जास्त शहरांमध्ये मागिल काही दिवसांमध्ये खूप कमी प्रमाणात वायु प्रदुषण झाल्याचे समजते.लाॅकडाऊनच्या फक्त चार दिवसांच्या आत देशातील कितेक शहरांचा एअरकाॅलिटी इडेक्स ५० वर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय जानकारांच्या माहितीनुसार एअरकाॅलिटी इडेक्स ५० च्या जवळपास असले कि शुध्द हवा श्र्वास घेण्यालायक असल्याचे सांगितले जाते.
निसर्गाला लाभलेलं सर्वात सुंदर सौख्य म्हणजे वृक्ष-वेली आणि प्राणी जीव. या लाॅकडाऊनच्या काळात बरीच मनमोहक चित्रे समोर आली. त्यातील कितेक तर खूप आनंददायी आणि पहिल्यांदाच पहायला मिळली. जिथे शहरे, गावे , खडे, तांडे लाॅकडाऊन मुळे उनाड झाले आहेत तिथे जंगली प्राणी आता शहरांकडे धाव घेताना दिसत आहेत सध्या जंगल आणि शहरे यातील बंध तुटताना दिसत आहे कारण कंपन्या बंद आहेत रस्ते शांत आहेत.या पसरलेल्या सन्नाट्यामुळे प्राणी हळूहळू आता शहरांमध्ये येत आहेत. ज्या पक्षांचा किलबिलाट ऐकायला लोक त्रस्त असायचे कुठे शोधूनही पक्षी नजरेस पडायचे नाही आज पर्यावरणात सुधारणा झाल्याने विविध पक्षांचे थवे पाहायला मिळत आहेत.आपल्या निरर्थक वागण्यामुळे हे हरवलेली पाखरे पुन्हा मोकळा श्वास घेत आहेत. लाॅकडाऊनचा सगळ्यात जास्त फायदा प्रकृतीला झाला थोडक्यात सांगायचे झाले तर हवा शुद्ध झाली नदी नाले स्वच्छ झाले. मानवी जीवन थांबल्यामुळे प्राणी, शहर आणि जंगल यातील अंतर कमी होत आहे. मानवाने स्वत:च्या सुखासाठी त्याने कित्येक जंगले नष्ट करून मोठं मोठी शहरे उभी केली.
थायलंडमध्ये तर चक्क माकडे रस्त्यावर भटकंती करताना दिसली.जिथे एकेकाळी फक्त गाड्या आणि माणसांची गर्दी असायची त्या रस्त्यावर आता ही माकडे वावरत आहेत. त्यांचे जंगलातुन शहरांकडे पलायन करण्याचा मुख्य कारण म्हणजे भूक.ते अन्नाच्या शोधात इकडून तिकडे भटकंती करत आहेत हि माकडे भटकंती करत असताना एका महीलेच्या नजरेस पडताच ती त्यांना अन्न देण्यासाठी समोर आली पण. प्राणीमात्रावर प्रेम आपण करतोच पण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण दुर्लक्ष ते करत असतो. लाॅकडाऊन आपल्याला आपण केलेल्या चुकांची जाणीव करून देत आहे असं म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही.
– हनुमंत चव्हाण