ठाणे: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्याकरिता व या संकटसमयी गरीब कुटुंबाना आधार देण्याकरिता प्ले फ्री स्पोर्ट्स इंडिया द्वारा PSI HOMEATHON – यू रन थे ईट या मोहिमेचं आयोजन दिनांक 2 मे रोजी करण्यात आले आहे . ज्या मध्ये स्पर्धकांना घरातच राहून ह्या मोहिमेत भाग घ्यायचा आहे. ही एक ऑनलाइन फिटनेस Mania आहे ज्या मध्ये सकाळी 7 वाजल्या पासून याची सुरुवात होईल त्यामध्ये झुंबा , फिटनेस, धावणे व चालणे असे ऑनलाइन कार्येक्रम होणार आहेत. ते ही घरात राहून हे सर्व होणार आहे. कोरोना मुळे सर्वजण घरातच बसून आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याकरिता सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुसरी विशेष बाब म्हणजे ज्या मध्ये डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सोसायटी आणि मेंडोन्सा फाउंडेशन यांच्या सहकार्याने मुंबईच्या विविध भागात गरजू लोकांना दररोज १२०० ते १५०० जेवण पॅकेट्स पुरवून मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. या कार्येक्रमातील नोंदणी शुल्कामधून जो पण निधी जमा होणार आहे तो गरजूंच्या सहायता करिता पूर्णपणे निधी संस्थेला दिला जाणार आहे.
सदर PSI HOMEATHON मध्ये भाग घेणाऱ्या सर्व सहभागींसाठी ई-प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. आपली नोंदणी करण्याकरिता https://bit.ly/3amqfJb या सांकेतिक स्थळावर जाऊन नोंदणी करावी. आपल्या स्वतःचे चांगले आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती राखून आणि इतरांना मदत करून कोरोनाला पराभूत करण्याच्या प्रतिज्ञात सामील व्हा असे आवाहन प्ले फ्री स्पोर्ट्स इंडिया द्वारा करण्यात आले आहे.