कोणीतरी म्हटले आहे आयुष्यावर बोलू काही पण कोरोनामुळे आयुष्यावर बोलण्यासारखे काही उरले नाही असच जणू काही वाटतय.चीनच्या वुहान प्रांतापासून या महाभयानक आजाराने जणू काही सगळे जगच आपल्या कवेत घेतले आहे मानव जातीवर संकट आणलेल्या कोरोनाने जगभरात धुमाकुळ घातला आहे.युरोप,अमेरिका इटली यांची कोरोनाग्रस्त आणि त्यामुळे बळी गेलेल्या लोकांची संख्या हादरवून सोडणारी आहे
अमेरिका,चीन या दोन महासत्ता यासोबतच इटली,युरोप,आफ्रिका, आशिया आणि आस्ट्रेलिया खंडातील असंख्य लोक कोरोनाचा सामना करत आहेत.सुरुवातीला अगदी सामान्य असा वाटणारा कोरोना आज लोकांच्या जीवनाचा अविभाज्य असा घटक बनला आहे.बाकी देशांच्या तुलनेत आपल्या देशात या रोगाचा जास्त प्रसार नसला तरी आज आपल्या देशातील परिस्थिती पाहता या रोगाचा सामना करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या एकजुटीची आणि सहकार्याची गरज आहे .जर असे झाले तर आणि तरच आपण यातून बाहेर पडू.कोरोनाशी सुरू असलेले युद्ध ही खऱ्या अर्थाने एक स्पर्धाच म्हणावी लागेल.हो, धावण्याची स्पर्धा….पण या स्पर्धेत माणूस नाही तर हा व्हायरस धावतोय….माणसांच्या मागे… त्यांच्या आयुष्याच्या मागे आज भारत विरुद्ध कोरोना हा अत्यंत भयानक आणि जीवघेणा खेळ पाहण्यासारख खूप मोठं दुर्दैव म्हणावे लागेल पण तरी पण या रोगाच्या नियंत्रणासाठी भारत सरकारच्या नवीन नवीन योजना…नवीन निर्णय हे जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य असे घेण्यात आपले सरकार यशस्वी अशी पाऊले उचलत आहे.अमेरिकेच्या चौपट लोकसंख्या असताना भारताने 10-12 दिवसापूर्वी लॉकडाऊनची सुरुवात केली आणि अमेरिकेला वेळेत असा निर्णय घेता न आल्यामुळे जगातली महासत्ता असतानासुद्धा आज त्यांच्या देशावर अवकळा पसरली आहे.. त्यामानाने आपले भारत सरकार नियोजनूर्वक असे काही निर्णय घेत आहे जे जनतेच्या दृष्टीने हिताचे आहेत.वेळीच पाऊले उचलली गेल्यामुळे अमेरिकेच्या तुलनेने भारतात या रोगाचा फारसा प्रभाव पडला नाही. गेल्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या हिताच्या दृष्टीने जे काही निर्णय घेतले ते सद्य परिस्थितीत योग्य असल्याचे आपल्याला दिसून येते….मोदींनी जो काही लॉकडाऊन करून जनतेला दिलास दिला त्याचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणात सफल झाल्याचा दिसून आलाय.जुन्या दंतकथा,पुराणकथा काहींना हास्यास्पद वाटतात पण त्याचमुळे शेकडो वर्षे आपल्या देशाला भारत नावाची राष्ट्रभावना एकजीव राखू शकली.रामायणात सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली होती तशी काही आपल्याला कोरोना विरूध्द लढाईतील लॉकडाऊनच्या रूपातील ही रेषा आपल्याला ओलांडून द्यायची नाही एवढंच साहाय्य होऊ शकत…सरकारने जे काही निर्णय घेतले त्यामुळे ती रेषा आपण आता काही ओलांडू शकत नाही म्हणून आपण आजही सुखरूप आहोत.यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेनेसुध्दा भारत सरकारच्या या प्रसंगावधनाचे कौतुक केले आहे.याच्या पुढे सांगायचं झालं तर संघटनेचे अध्यक्ष मायकल रेयान यांनी भारत यातून नवीन आदर्शच निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.चीनच्या मानाने भारताची कोरोना रुग्णांची संख्या हा जगाच्या दृष्टीने कौतुकाचा विषय झाला आहे.पण यासोबतच जगाला सुरक्षेची हमी देणं पण आपल्या भारतीयांच्या हातात आहे.कारण हा आजार गंभीर स्वरूपात फैलावला तर जगाची खैर नाही.व. पु.म्हणतातवादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. इथ सांगायचा मुद्दा इतकाच की आपण भारतीय आपल्यापुरती, देशासाठी लढाई लढत नसून अवघ्या जगातील लोकांसाठी ही लढाई आहे.त्यात आपला विजय हा संपूर्ण मानवजातीचा विजय असणार आहे….आणि सर्वांचं सहकार्य.. एकजूट यामुळे आपण आजपर्यंत त्याचा मुकाबला धैर्याने केलाय…असाच मुकाबला शेवटपर्यंत करून आपण सर्व भारतीय त्या कोरोनाचे नामोनिशाण देशातून काय या जगातून हद्दपार करून आपल्या या देशाला पर्यायाने जगाला नक्कीच यातून बाहेर काढू…ही लढाई आपण नक्कीच जिंकू.
– राहुल पाटीलLike this:
Like Loading...
Related