आज संपूर्ण जगात फक्त एकच नावच थैमान आहे ते म्हणजे कोरोना. हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संसर्ग होतो माणसात आणि त्याचा मृत्यू होतो खूप साधारण लक्षण या आजारात आहे सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास अडचण पण 14 दिवसानंतर हा खूप वाढतो आणि मानव मृत होतो, आज संपूर्ण जग या आजाराचा सामना करण्यास असमर्थ आहे विशेषतः चीन मधून याची सुरुवात होते आणि इतर सर्व जग या पासून हैराण होतय,
भारतात याचा शिरखाव झाला तो मार्च महिण्यात आणि शासनाने या लॉक डाउन हा उपाय सुचवीत त्याच पालन करण्यास जनतेला सांगितलं आजच्या घडीला साडेतीन हजार च्या वरती बाधीत रुग्ण आहेत सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आहेत पण आज लिहत असलेल्या विषयात शासन आणि प्रशासन आणि जनता या बद्दल लिहतोय, शासनाने घेतलेलं निर्णय आणि जनतेने स्वतः ची रक्षा करत किमान पाळत असलेली ही संहिता कोरोनाची साखळी मोडण्यास आपण असमर्थ ठरत आहोत त्यात भारतीय जमात या संहिताची पालन न करताना दिसत आहेत त्यांची मानसिकता ही धर्मांध दिसून येत आहेत त्यासाठी सरकारने घेतलेलं नियम ढाब्यावर ठेवत त्यांचं उलनघन करताय त्यासाठी त्यानां शिक्षा अपेक्षित आहेत ते करतील ही पण यात महत्वाची भूमिका पोलीस प्रशासन, डॉक्टर यांची मानली जातीय
भारत सरकार ने केलेली आश्वासने कितपत महत्वाची माननीय पंतप्रधान यांनी आपल्याला थाळी टाळ्या वाजवत सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यास सांगितले आणि आज घरातले दिवे रात्री 9 वाजता बंद करून एक नवीन प्रकाश जीवनात यावं आणि ही दुःखाची सावली त्या प्रकाशाने दूर होईल असला हुलचट प्रकार आपले पंतप्रधान नी सांगितला आज सगळ्यात जास्त मरवणूक होते ती दिनदुबलयांची त्यासाठी ठोस असे निर्णय घेतले जात नाही आहेत याची शोकांतिका आहे या संहितेत मध्यम वर्ग ही सरकारच्या निविचारी निर्णयाने चुरडला जातोय आणि आपण अंधश्रद्धालु पंतप्रधान च्या विचारणा मदत करताना दिसतोय आणि याच गांभीर्य दिसून येत नाही असो आज सर्वांना मीच माझा रक्षक असून या संकटाला सामना करत सामोरे जयाचे आहेत आणि या कोरोना आजारावर आपण सर्व लवकर मात करू हीच आशा.
– विजय खरे , मालेगाव