सध्या जगभरात सगळीकडे कोरोना आजाराने थैमान घातले आहे. चला तर आज आपण थोडक्यात जाणून घेऊया की काय आहे कोरोना.
कोरणा हा आजार covid 19 या विषाणू पासून आलेला आहे.कोरणा हा विषाणू प्राणी व पक्षी यापासून निर्माण झाल्याची पूर्ती सध्या विविध अभ्यासक व त्या संबंधित अधिकारी करत आहेत.तुम्हाला माहीतच असेल की जनावरांना किंवा पक्ष्यांना सर्दी झाली की त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो व वेळेत उपचार नाही भेटला तर श्वसनाचा त्रास होऊन ते मरण पावतात.किंवा अगदी सोप्प हिवाळ्यात कोंबडीच्या लहान पिल्लांना उष्णतेच्या कमतरतेमुळे जो त्रास होतो अगदी तसाच त्रास या आजारात मानवाला होतो. खरतर वैज्ञानिक दृष्ट्या कोंबडीचा व कोरोनाचा काही संबंध नाही.
चला तर आता थोडं कोरोनाच्या लक्षणांकडे वळूया.
कोरोनाची लक्षणे अगदी शुल्लक आहेत म्हणजे ज्या लक्षणाला आपण शक्यतो दुर्लक्ष करतो ते. उदा:-सर्दी ताप खोकला. (कोरडा/स्त्राव वाहक) ही सामान्य लक्षणे आहेत.
फक्त काही वेळा हात पाय दुखणे ,गळा दुखणे किंवा नाक वाहने, सर्दी ,अतिसार अशी लक्षणे दिसून येतात.
चला तर आता थोडं कोरोनाच्या उपचाराकडे वळूया, उपचार म्हटलं की सर्वात आधी आपण समजतो की लसीकरण किंवा प्रतिजैविक. पण अतिशय दुर्भाग्य किंवा वैज्ञानिक अभावामुळे जगात कुठे त्याची लस किंवा प्रतिजैविक उपलब्ध नाही. कोरोनावर् उपाय म्हणजे नेहमी सर्दी खोकल्यावर जो उपचार करतात तोच उपचार यावर शक्यतो करतात .अति महत्वाचे म्हणजे हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे त्या व्यक्तीला अतिरिक्त दक्षतेत व इतर दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे हा होय. हा आजार कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्तींना लवकर होतो म्हणून वयोवृद्ध व इतर काही आजार असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
शासन :-
शासनाबद्दल बोलायच्या आधी नेमकं शासन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया.
शासन म्हणजे चे नियम व कायदे आखलेले असतात त्यांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया म्हणजे शासन होय. आता शासन म्हणजे काय हे आपल्याला कळलं असेल तर आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊ या.
कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सर्वात महत्वाचे शासन म्हणजे कलम 144 म्हणजे संचारबंदी. संचारबंदी मुळे आपण कोरोनाला आळा घालू शकतो. यामध्ये काही महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे. शाळा महाविद्यालये व सर्व शैक्षणिक संस्था संस्था बंद ठेवणे, सामाजिक व राजकीय कार्यक्रमाला परवानगी नाकारणे, शॉपिंग मॉल व इतर दुकाने बंद ठेवणे, विविध गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी घालने, घरीच कार्यालयीन काम करणे, कोरोनाचा विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना, जिल्हा समन्वयक नेमणे, जीवनावश्यक वस्तूंची आयात निर्यात चालू ठेवणे, लॉकडाऊन, धार्मिक व प्रार्थना स्थळांबद्दल नियम, विविध पथकांची स्थापना, आपत्कालीन कक्ष या सर्व गोष्टींची आखणी शासनाने केली आहे.
प्रशासन :-
आधी आपण प्रशासन म्हणजे काय जाणून घेऊया.शासनाने जी योजना कायदे बनवले असतात त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य जी व्यवस्था करते तिला प्रशासन म्हणतात. याची संक्षिप्त माहिती तुम्हाला इयत्ता पाचवी ते दहावीच्या नागरिकशास्त्र व प्रशासन या पुस्तकात मिळेल. आता आपण परत मुख्य मुद्द्यावर वळूया .
कोरूना बद्दल महत्त्वाचा प्रशासन म्हणजे शासनाने जो १४४ कलम लागू केला तो.संचारबंदी ही जनतेकडून कशी अमलात आणून घ्यावी ही मोठी योजना प्रशासनाने राबवली आहे.यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला व तो प्रशासनाने राबवला पण. सामाजिक व राजकीय अशा सर्वच कार्यक्रमाला परवानगी न देऊन प्रशासनाने गर्दी न होऊ देण्याचे विशेष कार्य पार पाडले.तसेच प्रशासनाने शॉपिंग मॉल व इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश स्वीकारून तशी उपाययोजना केली. प्रशासनासमोर एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे रोजगाराचा त्यामध्ये सुद्धा ज्या लोकांना घरी बसून काम करता येईल अशा लोकांना घरी बसल्या काम करण्याचे आदेश देण्यात आले . महत्त्वाचं म्हणजे अतिरिक्त गर्दीचे ठिकाण म्हणजे लावणी, डान्सबार , पब सर्वांना आळा घालण्याचा विळा प्रशासनाने उचलला. कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या त्या पुढील प्रमाणे.प्रशासनाने परिसर निर्जंतुकीकरण, मास वापरणे, स्वच्छता राखणे, योग्य अंतर राखणे ,गर्दी टाळणे अशा अनेक उपाय योजना केल्या आहेत.त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एक समन्वयक नेमला आहे. त्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन पार पाडत आहे . महत्त्वाचा म्हणजे धार्मिक प्रार्थना स्थळांना सुद्धा नियमांचे पालन करण्यास भाग पाडले आहे व आपत्कालीन कशा बद्दल प्रशासन अतिरिक्त जागरूक आहे इत्यादी सर्व काम प्रशासन पार पडत आहे.
जनता :-
सर्वात आधी मी जनतेचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या आजाराला सुद्धा न घाबरता जनता कोरोनाशी वाटेल त्या मार्गाने लढण्यास सज्ज आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात ९ मार्च रोजी आढळला होता. पुणे येथे तो रुग्ण आढळून आला होता. पुढे पेशंट वाढत आहे या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला.खरंतर हा कर्फ्यू जनतेच्या भल्यासाठी होता परंतु जनतेने कर्फ्यू हास्यास्पद घेऊन कर्फ्यू पाळला नाही. आणि परिणामी लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले. आता लॉकडाऊन असताना सुद्धा जनता घरात थांबत नाही विविध बहाणे करून घराबाहेर पडते. त्याचाच परिणाम म्हणजे आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या वर आहे.
महत्त्वाचं म्हणजे काही लोक तर मोठेपणा म्हणून घराबाहेर पडतात.जसे की आपल्याला काही होणार नाही, आपल्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही किंवा मित्रांमध्ये बढाई मारण्यासाठी हे रिकामे वीर बाहेर पडत असतात.
दुसरं म्हणजे धार्मिक कार्य, एवढ मोठ संकट असताना सुद्धा लोक धार्मिक ठिकाणी गर्दी करताना दिसतात. माझं जनतेला एवढेच सांगणे आहे की आपण जेवढी गर्दी करू तेवढाच कोरोना आपल्या अजून जवळ येईल. परंतु काही ठिकाणी जनता योग्य पण वागत आहेत. जसेकी लोक फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडत आहेत. घरात राहूनच कोरोनाशी लढताय. या लोकांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे.
सरतेशेवटी हे सांगू इच्छितो की जर आपल्याला परत सुरळीत जीवन जगायचं असेल , कोरोनाला पळवायच असेल तर शासनाच्या नियमांना व प्रशासनाच्या प्रयत्नांना योग्य सहकार्य करा.
धन्यवाद….
–श्रीकांत भोरे