कोरोना संकटकाळाचा सामना सर्वच प्रशासकीय व्यवस्था, नागरिक तसेच सामाजिक संस्था आपल्या पद्धतीने करत आहेत. अनेक महानगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रात अडकुन असलेल्या तसेच गरजूंच्या मदतीसाठी कम्युनिटी किचनच्या माध्यमाने नागरिकांसाठी जेवणाची सोय करत आहे. कल्याण शहरांतील महालक्ष्मी भोजनालयचे श्री कुटुंब हे कम्युनिटी किचन १४ एप्रिल पासुन सुरू असुन आजवर एक लाखापेक्षा जास्त लोकांना जेवण देण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे रोज साधारण तीन हजार लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी सर्व कामगारांची तपासणी करण्यात येत आहे त्याचबरोबर रोज रात्री औषध फवारणी देखील करण्यात येत असते. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील वेळोवेळी येथील सर्व कामांवर योग्य लक्ष देवुन आहेत. महालक्ष्मी भोजनालय गेल्या सोळा वर्षांपासून कल्याण शहरांत अत्यंत चांगले आणि पौष्टिक जेवण नागरिकांना देत आहे. सध्याच्या संकटाच्या काळात महानगरपालिकेला मदत करण्याचा आणि संकटकाळी कोणीही उपाशी राहु नये यांसाठी आम्हीं प्रयत्नशील आहोत असे हर्षद पवार यांनी यावेळीं सांगितले. त्याचबरोबर रोज रात्री महालक्ष्मी भोजनालय जवळच्या वस्तीत गरजू लोकांना जेवण पुरवत आहे.