मुंबई : दीड वर्षापूर्वी मुंबईतल्या हॅबीटेड या स्टुडिओतील एका कोमेडी शो दरम्यान कोमेडिअन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर अचानक व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर एकच संतापाची लाट उसळली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमाचा कार्यक्रम झालेल्या हॅबीटेड स्टुडिओची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करताच अग्रिमाने माफीनामा प्रसिध्द करत. तिच्या युट्यूब चॅनलवरील तो वादग्रस्त व्हिडिओ डिलिट केला.
मात्र या सर्व प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे. अग्रिमाच्या व्हिडिओवर टिका करताना शुभम मिश्रा नावाच्या युट्यूबरने अग्रिमाबद्दल अत्यंत खालच्या भाषेचा वापर केला आहे. त्याने प्रसिध्द केलेल्या व्हिडिओमध्ये महिलांविरूद्ध अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्याचबरोबर त्याने अग्रिमाला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे सोशल मिडियावर संतापाची लाट उसळली आहे. अग्रिमा जरी चुकली असली, तरी एका महिलेविरूद्ध अशा प्रकारे टिका करणं कितपत योग्य आहे? असा सवाल सोशल मिडियावर विचारला जात आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी व्हिडिओची दखल घेत #ArrestBadassShubhamMishra वापरत ट्विट करून शुभम मिश्रावर कारवाईची मागणी केली आहे.
Dear @NCWIndia does this concern you, we see this scumbag give open threats to a female comedian who has already apologised & taken her objectionable video down… pic.twitter.com/c7OiHf0yUl
— Kunal Kamra (@kunalkamra88) July 11, 2020
सोशल मिडियावर शुभम मिश्राचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या व्हिडिओची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी गुजरातच्या डीजीपींना ट्विट करत शुभम मिश्रावर कडक कारवाईची मागणी केली आहे. अग्रिमाने माफी मागीतल्यानंतरही शुभमने तिच्यावर इतक्या खालच्या भाषेत टिका करणं आणि तिला धमकावणं अत्यंत लज्जास्पद असल्याचं कोमेडियन कुणाल कामरा याने म्हंटलं आहे.
Keeping in line with #NCW's commitment towards ensuring safety of #women online, our Chairperson @sharmarekha has written to @dgpgujarat for taking immediate action against Shubham Mishra, the man hurling abuses against a female comedian in this video.@kunalkamra88 @SaketGokhale https://t.co/6zfr6IEbyX
— NCW (@NCWIndia) July 11, 2020