यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा विद्यार्थी भारती कडून तीव्र धिक्कार. महाराष्ट्र राज्यातील १३ विद्यापीठांनी परिक्षा घेणं धोकादायक असल्याचे चिन्ह दर्शवत असताना देखील युजीसी च्या गाईडलाईन्स नुसार परीक्षा घेण्यात याव्या असे वक्तव्य करणाऱ्या पटवर्धन यांना ही प्रक्रिया इतकी सोप्पी कशी वाटू शकते असा प्रश्न विद्यार्थी भारती राष्ट्राध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला. येत्या १५ तारीख पर्यत परीक्षेचा निर्णय रद्द न झाल्यास १६ तारीख पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा मंजिरी धुरी यांनी दिला आहे.
दरम्यान, कोविड च्या काळात परीक्षा महत्वाच्या की विद्यार्थ्यांचा जीव यातील महत्व ठरवता येत नसण्याइतके पटवर्धन यांचे विचार बालिश आहेत का? खुद्द उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातच काय तर संपूर्ण देशात ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नाही तरी असे हवेत पर्याय देणं कितपत योग्य आहे याचा विचार पटवर्धन यांनी करावा.