मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. अशात कोरोनामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या रखडलेल्या परिक्षा राज्यांनी ऑनलाईन पद्धतीने घ्यावा असे आदेश यूसीजीने दिले होते. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या परिक्षा न घेण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब करण्यात आला.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार ठाम राहिले. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले आहे. त्याच बरोबर ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय सुध्दा सरकारने घेतला असून या संकट काळात सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा केल्याबद्दलही मंजिरी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या हिताची ही लढाई अजून संपली नसून आता थेट केंद्र सरकार विरूध्द उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
येत्या दोन दिवसात यूसीजीने शेवटच्या वर्षातील विद्यार्थांची परिक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यूसीजीने हा निर्णय रद्द न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिला आहे. विद्यार्थी आणि केंद्र यांच्यातला हा वाद आता कोणत्या वळणावर जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.