साधारणता चाळीशीच्या मंडळींची तक्रार असते ती म्हणजे संधीवात आणि गुडघ्याच्या सांधेदुखीची संधीवातामध्ये शरीरातल्या सांध्यांमध्ये कळा येऊन तो भाग आतून दुखू लागतो सोसतो कडक होतो त्यामुळे साध्या मधून बारीक कळा येतात.प्राथमिक स्वरूपात ऊठबस करताना पायऱ्या चढताना होणाऱ्या वेदना ही या आजाराची प्राथमिक लक्षणं असतात.संधीवाताच्या प्रमाणात लक्षणात आणि होणाऱ्या त्रासात भिन्नता असली तरी वयोगट मात्र एकच असतो.ठराविक वयानंतर स्वतःवर काही बंधन घालून घेतल्यास यातले बरेच त्रास कमी करता येतात.
संधिवात टाळण्यासाठीच्या सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स
*नियमित व्यायाम.
*वजनाची पातळी कायम राखणं.
* जमिनीवर बसणं ,पायऱ्या चढणे टाळावं.
* नेहमी संतुलित आहारच घ्यावा.
संधिवात असह्य झाल्यावर त्यावर मात करण्यासाठी पेनकिलर घेऊन वेदना तात्पुरत्या शमवण्याकडे कल असतो. मात्र त्रासातून तात्पूर्ती मुक्ती मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या औषधांमुळे पुढे दुष्परिणाम दिसून येतात. या औषधांच्या दाहकतेचा किडनीवर कायमचा परिणाम होऊन त्या कायमस्वरूपी निकामी होऊ शकतात.