रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबू सरबत हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. लिंबू सरबत पिण्यामुळे शरीरात ऊर्जेची निर्मिती होत असते. यातील ‘क’ जीवनसत्वामुळे त्वचेला चांगले पोषण मिळते. यामुळे चेहऱ्यावर तेज येते. याच्या नियमित सेवनाने वजन लवकर कमी होते. याचे अनेक फायदे असून याबाबत माहिती घेवूयात.
लिंबू सरबत पिण्याचे फायदे :-
1)याच्या अँटिसेप्टिक गुणामुळे अंतर्गत रक्तस्राव थांबतो. नाकातून रक्त येत असल्यास कापसाच्या बोळ्यावर लिंबाचा रस घेऊन नाकात ठेवा.
2)हे नियमित सेवन केल्याने मलेरिया, कॉलरा, डिप्थेरिया, टायफॉईड व अन्य घातक आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.
3) कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध मिसळून पियल्यास वजन लवकर कमी होते.
4) दात दुखत असलेल्या ठिकाणी ताज्या लिंबाचा रस लावा.
5) कोंडा, केस गळणे, आदीसाठी केसांच्या मुळाशी लिंबाचा रस लावा.