जगभरातून बऱ्याच देशांमध्ये मंगल प्रसंगी मेहंदी लावायची प्रथा प्रचलित आहे. संपूर्ण भारतात महिलांनी मेहंदी लावण्याची परंपरा आहे. विविध सण, शुभकार्यामध्ये महिला हात आणि पायांवर मेहंदी काढतात. बरेच लोक केसांनाही मेहंदी लावण्यास प्राधान्य देत असतात. परंतु, मेंदी चांगल्या दर्जाची नसेल अथवा तिच्यात रसायनिक पदार्थ मिसळलेले असतील तर मेंदीच्या रंगाचा बेरंग होऊ शकतो. यामुळे शारीरीक समस्या निर्माण होऊ शकतात. रसायनयुक्त मेहंदीमुळे नववधुच्या हाता-पायावर फोड आल्याचे तसेच त्वचा जळाल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. म्हणून भेसळयुक्त मेहंदी घेणे टाळले पाहिजे.
मेहंदी लावत असताना या गोष्टी लक्षात ठेवा:-
1) मेहंदीमुळे कोणतीही समस्या झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. अन्यथा ही अॅलर्जी संपूर्ण शरीरात पसरू शकते.
2) मेहंदी पाच मिनिटांत रंगू शकत नाही. ही दोन ते तीन तास भिजवावी लागते.
3) मेहंदीमध्ये सोडियम पिक्रामेट हे हानिकारक केमिकल मिसळले जाते. जे ज्वलनशील पदार्थांमध्ये मिसळले जाते.
4)खऱ्या मेहंदीचा रंग गडद काळपट लाल नसतो, तर नारंगी अथवा गडद लाल असतो.
5) मेहंदीमध्ये पीपीडी मिसळले जाते. जे केस काळे करण्याच्या हेअरडायमध्ये वापरले जाते. काळ्या मेंदीसाठी याचा वापर केला जातो.
6) केमिकलच्या मेहंदीमुळे त्वचेत खाज, जळजळ, सूज व अन्य समस्या होतात. शिवाय काहीवेळा फोडसुद्धा येतात.
7) केसांना मेहंदी लावल्यावर ती जास्त वेळ न ठेवता धुऊन टाकावी. अन्यथा सर्दी, पडसं यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.