माणिक नावाच्या एका पोरक्या लहान मुलाला वर्हाडातील संत अडकोजी महाराज यांनी सांभाळल, मोठे केले, तुकड्या हे आहे नाव दिले. गावोगावी भजनातून समाज जागृती करणारा हा मुलगा पुढे तुकडोजीमहाराज झाला. हरिनामा इतकाच राष्ट्रभक्ती सामाजिक एकता यावर त्यांचा भर असे. समाजातील अनिष्ट रूढींवर ते कोरडे ओढित. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध जनमत जागृत करीत. खंजिरी च्या साथीने पहाडी आवाजातील त्यांच्या भजनाने जनमाणसावर विलक्षण प्रभाव पडे.
होईल जीवनाची उन्नती l ज्ञान विज्ञानाची प्रगती
अशीच असावी ग्रंथ संपत्ती l गावोगावी
गावागावातून ग्रंथालय असणे आवश्यक आहे. ग्रंथ हे माणसाचे गुरू होत. ग्रंथ हे माणसाला मार्ग दाखवणारे असतात. ग्रंथही मित्रासारखे उपयुक्त आनंददायी असतात. सर्व काळ सुख दुःख निराशा यात ग्रंथ साथ देतात. ग्रंथांद्वारे ज्ञान-विज्ञानाची नवी कवाडे खुली होतात. नवीन ज्ञान मिळवण्याचा मार्ग खुला होतो. जीवनात प्रगती साधता येते. असाच संदेश ते आपल्या भजन कीर्तनातून सर्वांना देत असत.