शुभ दसरा !! दर वर्षी दसरा आला की आपट्याच्या झाडांवर संक्रांत ओढवते .आपट्याच्या पानांसाठी झाडांची क्रूर कत्तल होते .वाढत्या शहरीकरणात आपटयाची झाडे अदृश्य होत चालली आहेत .सोने म्हणत म्हणत कचऱ्यात टाकली जातात ती पाने. काही वर्षांनी दिसणारच नाही दसऱ्याला हा आपटा .
विविध प्रकारच्या फुलपाखरांना(Black Rajah ,Lemon emigrant ) अंडी घालण्यासाठी आपट्याचीच पानं लागतात(Larval host plant ) .त्यांच्या अळ्या फक्त आपट्याची पानं खाऊनच वाढू शकतात ,अन्यथा त्या उपासमारीने मरतात .
जैव विविधतेच्या मौक्तिकमाळेत प्रत्येक जीवाचे एक स्वतःचे महत्वाचे विशिष्ट स्थान आहे .एक मोती निखळला की पूर्ण माळ कवडीमोल होते .
मित्रांनो आपट्याची तोडून आणलेली पाने सोने म्हणून वाटण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाने दर दसऱ्याला एक आपट्याचे झाड लावून ते जगवण्याचा आनंद लुटूया .
वृक्षारोपणात परदेशी मुळाची गुलमोहर आणि अशोकाची कचरा करणारी निरुपयोगी झाडे लावण्यापेक्षा सदाहरित आपट्याची पर्यावरणास हातभार लावणारी झाडे लावून जगवुया
लेखक : निळकंठ जयंत आंबये.