आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’असे म्हणतात. इंग्रजी राजवटीत नोकरी करीत असताना वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे त्यांची व आजारी आईची भेट होऊ शकली नाही.यामुळे त्यांच्या मनात इंग्रजी सत्तेविषयी तीव्र चीड निर्माण झाली.त्यांचे मन बंडखोर बनले. सशस्त्र लढाचा प्रारंभ त्यांनीच केला.
भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विरास काळ्यापाण्याची शिक्षा झाली. एडननच्या तुरुंगात त्यांना इंग्रजांनी डांबले ‘दधीचि ऋषिनी आपल्या अस्थी देवासाठी दिल्या मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये? ‘ हे त्यांचे मृत्यूपुर्वीचे उद्गार.
भारत मातेच्या शिरढोण या गावच्या सुपुत्राचा जन्मदिन 4 नोव्हेंबर 1845 झाला. सार्वजनिक सभा, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा संस्थांचा हे संस्थापक आपल्या कार्याने अनेक स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा आणि स्फूर्ती देऊन कीर्तिरूपे अमर झाले. दि.17 फेब्रुवारी 1883 ला त्यांनी देहत्याग केला.