इ.स.1843 च्या 5 नोव्हेंबरला सांगली येथे विष्णुदास भावे यांनी राजासमोर सीतास्वयंवर या स्वतः लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग करून दाखविला.
मराठी नाटकाचा प्रारंभ तेव्हापासून झाला असे मानले जाते. त्यानंतर विभाग यांनी आणखीन 10 आख्याने तयार करून त्याचे प्रयोग सादर केले. व ते पुण्या-मुंबईत ही लोकप्रिय झाले.
त्यापूर्वी नाटकातील मंडळी येऊन श्रीकृष्ण चरित्रावर खेळ करून दाखवीत ते पाहिल्यानंतर सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी मराठी तसेच करून दाखविण्यास प्रोत्साहन दिले त्यानंतर विष्णुदास भावे यांनी पहिला प्रयोग चिंतामणराव पटवर्धन यांना करून दाखवला.
विष्णुदास भावे हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख ” महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो.”