पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे ‘पु.ल.देशपांडे’ या नावाने प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांच्याविषयी कौतुकाने म्हटले जाते.विनोदी लेखक, नाटककार, सिने-नाट्य दिग्दर्शक, संगीतकार, उत्तम नट, गायक, हार्मोनियम पटू, प्रभावी वक्ते आणि प्राध्यापक असे हे अष्टपैलू साहित्यिक आहेत.
एकपात्री नाट्यप्रयोग ही पुलंची खास निर्मिती बटाट्याची चाळ, खोगीरभरती, असा मी असामी, पूर्वरंग, अपूर्वाई हे त्यांचे पुस्तके फार घातली. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकातील अंतू बर्वा चितळे मास्तर नानापरी आधी व्यक्तिरेखा ‘हसू आणि आसू’ आणणारे आहेत. तुझ आहे तुझपाशी व ती फुलराणी ही त्यांची नाटके व गुळाचा गणपती हा (सबकुछ पु. ल.देशपांडे असलेला ) चित्रपट अविस्मरणीयच.
‘ पद्मश्री ‘ देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.