न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला आहे. याचं महत्वाचं कारण ठरल्या आहेत प्रियांका राधाकृष्णन.
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे.
तर गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी प्रियांका राधाकृष्णन यांचा मल्याळीतून बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूरला राहिल्या. प्रियांका राधाकृष्णन या आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत.
लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. आता पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे.