ADVERTISEMENT
ठाणे येथील कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला असून जॅक्सनचा वध करणारे क्रांतीवीर अनंत कान्हेरे वीर,अण्णा कर्वे व विनायक देशपांडे या तीन देशभक्तांना 19 एप्रिल 1910 रोजी या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती.
हे कारागृह बावीस एकर जागेमध्ये वसले असून कारागृहाच्या बाहेर मारुती मंदिर प्रसिद्ध आहे.या कारागृहाची इमारत भुईकोट किल्ला म्हणून बांधलेली होती 1730 मध्ये बांधकामाला सुरुवात झालेल हा पाच बुरुजांचा भक्कम किल्ला 1734 मध्ये बांधून पूर्ण झाला असा उल्लेख इतिहासात आढळतो.