कोकण विभागातील सात जिल्ह्यांच्या २०२१-२२ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यांना मंजुरी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. चालू वर्षाच्या खर्चाच्या आढाव्यानंतर पुढील वर्षाच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समित्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे निकष जारी, ‘आव्हान निधी’ राखीव. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना ५० कोटींचा अतिरिक्त निधी. महिला व बालविकास योजनांसाठी ३ टक्के निधी राखीव. कोरोनाचा अखर्चित निधी आरोग्यसेवेसाठी खर्च करणार अशी माहिती मुंबईत दिली.