पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासंदर्भात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
दरम्यान,राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड येथे पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.