मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील धापरपाडा येथे स्थानिक आदिवासींनी विकसित केलेल्या पर्यटन स्थळाला भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील धापरपाडा येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ जोडणीचा शुभारंभ करण्यात आला.तसेच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली.