सरोजिनी नायडू या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी कार्यकर्त्या,प्रभावी वक्त्या व कवयित्री होत्या. वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय एक शिक्षणतज्ञ होते. वयाच्या बाराव्या वर्षी सरोजिनी मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर निजामाची शास्त्र वृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मातृभूमीला परतावे लागले. त्याला लहानपणापासूनच कविता करीत असत.
इंग्लंडमध्ये एडमंड गॉस या साहित्यिकाच्या प्रेरणेने त्यांच्या इंग्रजी कवितांचे संग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या सुंदर कविता मुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लोक त्यांना भारतीय कोकिळा म्हणू लागले. क्षमा प्रतिष्ठा स्त्री-स्वातंत्र्य, राष्ट्रवाद यांच्या त्या जहाल पुरस्कर्त्या होत्या. काँग्रेसच्या व गांधीजींच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सहभाग असे. हिंदू मुसलमान टक्के स्त्रियांना बरोबरीचे हक्क व स्वातंत्र्य हे त्यांचे जीवितकार्य झाले. त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल होत्या.