पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ ६ मधील एस वाॅर्डातील चालू तसेच प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, उपआयुक्त व सह आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक पार पडली.
दरम्यान, संबंधित बैठकीत पवई लेकचे सुशोभीकरण, परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यटनाच्या अनुषंगाने सोयी सुविधा निर्माण करण्यासंदर्भात विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या साहाय्याने पवई लेक येथे पर्यटकांसाठी ‘क्रोकोडाईल सफारी’ सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.