आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जनतेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिनाभर २ ते ३ हजारादरम्यान असलेली रुग्णसंख्या आज ५ हजाराच्या पुढे पोहोचली आहे.
दरम्यान, त्यामुळे,नागरिकांनी मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.