संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीनुसार इ. ३ री मराठी माध्यमाचा राज्यस्तरीय ऑनलाईन स्नेहसंमेलन सोहळा
नुकताच अतिशय रंगतदार व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.त्यात काही विद्यार्थ्यांनी गाणं सादर केले तर काहींनी नृत्य तर काहींनी नाट्यछटा सादर केल्या. बृहन्मुंबई महानगरपालिका: शिक्षण विभागाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी महेशजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली “शाळा बंद पण शिक्षण सुरू” या ऑनलाईन शिक्षण उपक्रमात उपशिक्षणाधिकारी संजीवनी कापसे, विभाग निरीक्षिका व मराठी माध्यम प्रमुख प्रिती पाटील व इ.३ री च्या प्रमुख विभाग निरीक्षिका शोभा जामघरे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला असून मुख्याध्यापिका रजनी आव्हाड, सी.एन.ओ कविता महाले आणि सर्व तज्ज्ञ शिक्षक यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. यंदाच्या वर्षी दररोज विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण दिले जात असून साडेतीन तास रंगलेल्या या सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक , अधिकारी वर्ग, मुख्याध्यापक उपस्थित होते.या यशस्वी सोहळ्यासाठी इ.३ री च्या सर्व टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.