आज माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूकला तज्ज्ञ म्हणून केली जाते. निर्मिती, बांधकाम, शिल्पकला, सोनेकाम करणाऱ्या व्यक्तींसाठी विश्वकर्मा जयंती महत्त्वाची मानली जाते.
विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वज्र निर्माण केले, अशी मान्यता आहे. या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा
यांनी केली आहे.