आपल्या सर्वांनाच माहित आहे की पृथ्वी असा एक ग्रह आहे जेथे सजीव आहेत. येथे पाणी, हवा व सजीव विविध घटकांनी सामावुन घेतले आहे. येथील जमिन अशी आहे की नव्याने निर्माण होण्यासाठी फक्त बियांची गरज आहे. आपली स्वृष्टी सुंदर, निर्मळ आहे. समुद्र व बेटांनी जणू पृथ्वीवर रांगोळी काढली आहे. रंगिबेरंगी फुले, पाने, प्राणी, पक्षी आहेत आणि महत्त्वाचं हुशार मनुष्यप्राणी आहे.पण तुम्हाला वाटतं का? आपली पृथ्वी जशी निर्माण झाली तशीच आहे. नाही तर यामध्ये खुप मोठी तफावत आहे. वातावरण बदल असो वा मानवी जीवन सगळेच काळानुसार बदलत गेले आहेत. सगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञान वापर वाढत आहे. बेकारी आणि दारिद्रय यांची संख्या वाढत आहे.
वातावरण बदलल्यामुळे सर्वंच स्तरांत प्रदुषण वाढत आहे. वायु प्रदुषण, जल प्रदुषण वाढ होत आहे. यामुळे प्राणी व पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. जंगल तोडून सिमेंटने नवं शहरं बांधलं जातं आहे. निसर्गाचा रंग फिका पडत आहे. वन्य प्राणी संख्या कमी होत आहेच त्याचबरोबर काही प्राणी, पक्षी नाहिसे झाले आहेत. प्राणी, पक्षी आपल्या पृथ्वीचं सौंदर्य आहे. ती सुंदरता त्यांच्यासोबत निघून गेली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला लक्षात येणार कि आपल्या येथे ऑक्सिजन न मिळाल्याने किती तरी लोकांचा जीव जात आहे. टेक्नॉलॉजी वाढते पण जे नैसर्गिक आहे ते निर्माण करणे आपल्या टेक्नॉलॉजीला जमले नाही. त्यामुळे आपण या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. हिच काळाची गरज आहे. पृथ्वीच्या सुंदरतेसाठी आपण सर्वांनी झाड लावली पाहिजे ती जगवली पाहिजे. प्लास्टिक वापर कमी केला पाहिजे. पृथ्वीला सुदृढ करण्याची जबाबदारी आपलीच आहे.
लेखक – कीर्ती पटवा