ADVERTISEMENT
आपण भारतीय आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ वापरतो.मीठा मधल्या सोडियम व क्लोराइड या क्षारांचा मुळे रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो. रक्तदाब वाढीसाठी तसेच हृदयविकार पक्षघात यासारख्या गंभीर आजारांसाठी मिठाचं अतिसेवन कारणीभूत ठरतं सुमारे सहा ग्रॅम मीठ आपल्या आहारात पुरेसं असतं.
आहारात मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या टिप्स
- आहारात मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्न शिजवताना मीठ कमी घालावे
- खारट पदार्थ उदाहरणार्थ खारावलेले मासे पापड लोणची फरसाण इत्यादी व्यर्ज करावेत.
- ताटात जेवताना अतिरिक्त मीठ वाढून घेऊ नये.
- सलाड किंवा कोशिंबीर मीठ न घालताच लिंबू पिळून खावे.
- ताज्या भाज्या,केळी,संत्री, शहाळ्याचे पाणी इत्यादी पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन वरचेवर करावे.