अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या मुलीने म्हणजे स्वानंदीने सध्या सोसिअल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोनी प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि विडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने सध्या तिचा काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये फोटो पोस्ट केले आहेत. आणि तिने हे मोठ्या प्रमाणांत व्हायरल होताना दिसून येत आहेत.
दरम्यान, वडिलांन प्रमाणे तिने देखील तिच्या तिच्या करियरची सुरुवात नाट्य क्षेत्रातून केली आहे. धनजंय माने इथेच राहतात का हे तिचे पहिले नाटक. तिच्या या पहिल्या नाटकात तिच्या सोबत अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणजे तिची आई सुद्धा आहे. सध्या स्वानंदीचे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ३५ हजारांहून अधिक फॉलोवर आहेत.