मानवाला शांत झोपेची गरज ही वारंवार वाटत असते. अर्धवट झोप झाल्यावर चिडचिड वाढण्याची दाट शक्यता असते. परिणामी शांत झोप येणे फार गरजेचे असते. त्यासाठी मानवाकडून वेगवेगळे उपायही केले जात असतात.
१ झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध पिल्याने शांत झोप लागते. दुधामधील अमिनो अॕसिडमुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
२ दिवसभरात थोड तरी दह्याचे सेवन केल्यास शांत झोप लागते.
३ झोपण्यापूर्वी दूध किंवा पाण्यासोबत चिमुटभर जायफळ पावडर घेतल्यास शांत झोप लागते.
४ झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस, साखर आणि मध एकत्र करून चाटण घेतल्यास चांगली झोप लागते.
५ चांगल्या झोपेसाठी रात्रीच्या जेवणात कांद्याचे सेवन करावे.
६ झोपण्यापूर्वी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पाने घालून अंघोळ केल्यास शांत झोप लागते.
७ रात्रीच्या जेवणात फळांचा रस आणि ताज्या भाज्या यांचे सेवन करावे.
८ झोपण्यापूर्वी खूप पाणी पियू नये तसेच अन्य उत्तेजक द्रव पदार्थ टाळावे.
९ झोपण्यापूर्वी प्राणायाम केल्यास शांत आणि स्वस्थ झोप लागते. तसेच झोपताना एखादे पुस्तक वाचावे.