कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची विशेष सुट्टी दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगने दिली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार – कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्याला कोरोना झाल्यास त्यांना १५ दिवसांची विशेष सुट्टी मिळणार आहे.
दरम्यान, तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य या स्पेशल सुट्टी दरम्यानही ठीक झाले नाहीत, तर कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्तीच्या डिस्चार्ज होईपर्यंत वेगळी सुट्टी सुद्धा मिळणार. यामध्ये, एखाद्या कर्मचाऱ्यांची एकही सुट्टी शिल्लक नसेल, तरीही ही त्याला १५ दिवसांची विशेष सुट्टी घेता येईल. जर केंद्रीय कर्मचारी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याला २० दिवसाची सुट्टी मिळेल. यामध्ये संक्रमणानंतर २० दिवसाचा कम्यूटेड लीव्ह किंवा अर्ण लीव्ह मिळू शकणार तसेच सुरुवातीचे सात दिवस ऑन ड्युटी सुद्धा मानले जातील.