सकाळी झोपेतून उठल्यावर कंटाळा येत क्षअसेल आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नसेल म्हणजेच थकवा आल्याचे जाणवत असेल तर काही उपाय –
१) सर्वप्रथम आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. अपुरी झोप झाल्यामुळे चिडचिड होते आणि जास्त झोप झाली की शरीरात आळस निर्माण होतो.
२) पाण्यात थोडे मीठ घालून अंघोळ केल्यास रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.
३) थोड्या प्रमाणात थंड पाण्याने अंघोळ केल्यास थकवा दूर होतो.
४) जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती अवलंबून असते. व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहयुक्त जेवनाने ताकद वाढते. म्हणून जेवणात फळे आणि भाज्यांचे प्रमाण जास्त असावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
५) शरीराला मालिश केल्याने देखील आळस दूर होतो.
६) व्यायामामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळया जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे. ताजी हवा आणि मोकळया वातावरणामुळे थकवा दूर होतो.
७) थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीरातील ऊर्जा संपते आणि थकवा येतो.
८) थकवा दूर करण्यासाठी ऊत्तम व्यायाम म्हणजे दिर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा. याने मन शांत आणि स्थिर होते.
९) रंगांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव होतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला प्रसन्न करतात.