कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने नवे नियम आणले आहेत. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला तसेच तिसऱ्या स्तरातील जुने निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर इतर वस्तू आणि सेवांचा व्यवहार करणारे दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहतील – तर रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहील.
तसेच आता कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही तसेच अत्यावश्यक सेवेत नसलेली सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील.
धार्मिक स्थळे बंद राहतील नागरिकांना सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर फिरता येणार नाही नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई होईल.
आता पाच स्तराऐवजी राज्याची विभागणी तीन ते पाच अशा स्तरांत करण्यात आली आहे यामुळे गेल्या आठवडय़ात पहिल्या व दुसऱ्या स्तरात असणारे सारे जिल्हे आता तिसऱ्या स्तरात समाविष्ट झालेत.