देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने उद्या पासून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे
यानुसार स्टेट बँकेच्या खातेदारांना आता एका महिन्यांत केवळ चार वेळेसच मोफत पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे.नव्या नियमानुसार ग्राहकांनी एका महिन्यात एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यानंतर प्रत्येक ट्रांझेक्शनसाठी १५ रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल
दरम्यान, तसेच बँकेकडून एका वर्षासाठी पहिले दहा चेक मोफत दिले जातील मात्र त्यानंतरच्या दहा चेकसाठी ४० रुपये तर २५ चेकसाठी ७५ रुपयांचे शुल्क आकारले जाईल. याशिवाय इमर्जन्सी चेकबुकसाठी ५० रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल या नियमांमधून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात आली आहे.