आजच्या दैनंदिन जीवनामध्ये बरेच लोक मधुमेह ग्रस्त आहेत. या आजारामध्ये रक्तात साखरेची पातळी वाढते. मधुमेह असलेल्या लोकांनी आहाराकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. सतत हेल्दी गोष्टी खाल्ल्याने रक्तातली ग्लुकोजची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते.
१: मधुमेह असलेल्या व्यक्तीने चालण्याचा व्यायाम करावा. रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त किंवा कमी असेल तर व्यायाम टाळावा.
२: व्हिटॅमिन सी मधुमेहासाठी देखील उपयुक्त आहे. दररोज ६०० मिलिग्राम व्हिटॅमिन सी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी सुधारते.
३: भरपूर पाणी प्या. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. शिवाय जास्त पाणी पिल्यामुळे आपण हेल्दी आणि निरोगी राहतो.
४: फ्रोझन मांस, चीज पिझ्झा, स्नॅक्स इत्यादीसारखे सोडियम पदार्थ टाळावेत. विशेष करून मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फास्ट फूड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजेत.