आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होणारे फायदे खालीलप्रमाणे
१) जास्त थकावट वाटत असेल आणि जर आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर थकावट दूर होते.
२) मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रंग गोरा होतो. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि आपली त्वचा सॉफ्ट आणि चमकदार बनते.
३) शरीरावर कोण्यात्याही प्रकारचं इन्फेकशन झालं असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने फायदा मिळतो.
४) मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांना मजबूती मिळते.
५) थंडीच्या दिवसात खूप लोकांना अंगाला खाज येते व ज्या मुळे अंगावर लाल डाग पडतात.
६) मिठाच्या पाण्याने रोज आंघोळ केली तर खाज येणं बंद होते.
७) विषारी कीटकांनी चावल्याने शरीरावर एलर्जी येते.मिठाच्या पाण्यानेआंघोळ केल्याने या विषाचा परिणाम कमी होतो.
८) मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खांदे दुखी कमी होते.
९) त्वचेवर सुरकुत्या येत नाही.
१०) मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांमध्ये दुर्गंधी व केसांमधील कोंडा कमी होतो.
११) मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.