बॉलिवूडमध्ये कोणाचं तरी अफेअर सुरू असतं तर कोणाचं नातं संपत असत. आज बॉलिवूड स्टार अमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. ही बातमी नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.
ADVERTISEMENT
अमिर खान आणि किरण यांची खूप चांगली केमिस्ट्री होती. एक जोडी म्हणून ते सर्वांचे फेव्हरेट बनले होते. हा घटस्फोट नेकमा कोणत्या कारणाने झाला आहे हे समोर आलेले नाही. ‘दोघेही आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल’, असे आमिर खानने सांगितले आहे.