ADVERTISEMENT
अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केले आहे. या प्रकरणात मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचा निकाल देताना पुणे कोर्टाने बागवे यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
दरम्यान, नगरसेवक अविनाश बागवे या निकालाविरोधात १७ जुलैला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं ते म्हणाले आहेत. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव आहेत.