सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. त्यावरून सतत आणि बराच काळ दूरपर्यंत प्रवास करण्याची गरजही वाढत चालली आहे.सततच्या वाहन चालविण्याने कंबरेचे दुखणे सुरू होते आणि काहीवेळा तर वाहन चालवणे सोडायचीही वेळ काहीजणांवर येते. रस्ते चांगले नसणे, दुचाकी वाहनांचे चांगले नसणे अशी बरीच दुय्यम कारणेही कंबरदुखीस कारणीभूत ठरू शकतात. पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते.
१) रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.
२) योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात ).
३) सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.