तुम्हला सुध्दा उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे. जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही वेळीच सावध राहा. अश्या प्रकारे उभे राहून पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी धोकादायक आहे. आजकालच्या धक्कादायक जीवनात प्रत्येक जण लवकर जाण्यासाठी घाईघाईने उभ्याने पाणी पिण्याची सवय असते. जर जाणून घ्या उभ्याने पाणी पिण्याचे कोणकोणते धोके आहेत.
१: उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.
२: जळजळीचा त्रास सुद्धा उभ्याने पाणी पिण्याने होतो, प्यायलेले पाणी अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.
३: उभं राहून पाणी पिल्याने तहान भागात नाही. उभं राहून पाणी पियाल्यानंतर सतत थोड्या वेळाने तहान लागत राहते. त्यामुळेच निवांत एका जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.